यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोक व्यायाम, आहार असे अनेक प्रयत्न करत आहेत.
शरीराचे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आहारही महत्त्वाचा आहे. रात्री 'हे' पदार्थ खाणे टाळावे.
रात्रीच्या वेळी सोडा आणि सॉफ्ट ड्रिंक्ससारखे कार्बोनेटेड पेये प्यायल्याने वजन वाढू शकते. त्यातील उच्च साखर आणि कार्बोनेशन पचन आणि झोपेमध्ये व्यत्यय आणू शकते.
रात्रीच्या वेळी फ्रोझन फूड खाणे टाळा. कृत्रिम संरक्षक आणि हायड्रोजनेटेड तेल वापरून बनवलेले असे खाद्यपदार्थ वारंवार गरम केल्यावर त्यांचे पोषणमूल्य गमावतात आणि त्यामध्ये कॅलरीज जास्त असतात.
केचप हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. त्यात उच्च फ्रक्टोज कॉर्न सिरप असते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. तसेच केचपचे नियमित सेवन केल्याने कॅलरीज वाढू शकतात.
फ्रेंच फ्राईज चवीला वरचढ असले, तरी आरोग्याच्या दृष्टीने ते तितकेसे चांगले नाहीत. त्यात असलेल्या सॅच्युरेटेड फॅट, कोलेस्ट्रॉल आणि कॅलरीजमुळे वजन वाढू शकते.
एकदा तुम्ही पॉपकॉर्न खाण्यास सुरुवात केली की, वेळ कसा निघून जातो ते कळत नाही. परंतु त्यातील ट्रान्स फॅट आणि सोडियम तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रयत्नांवर पाणी फिरवू शकतात.