हनुमान चालीसा नक्की कोणत्या वेळी वाचावी?

By Harshada Bhirvandekar
Apr 15, 2024

Hindustan Times
Marathi

असे मानले जाते की जे नेहमी हनुमान चालीसाचे पठण करतात त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते.  

कारण हनुमानजी हे केवळ जागृत देवता नसून, अष्टसिद्धी आणि नवनिधी दाता देखील आहेत. 

हनुमान चालीसा पठणामुळे मनोबल वाढवते. तसेच, नकारात्मक शक्ती देखील जवळ फिरकत नाही. 

त्यामुळे बरेच लोक रात्री झोपण्यापूर्वी हनुमान चालीसा पठण करतात. परंतु हनुमान चालीसा पठण करण्याची योग्य वेळ कोणती आहे? चला जाणून घेऊया...  

हनुमान चालीसाचे पठण दिवसाच्या कोणत्याही वेळी करणे योग्य आहे, असे म्हटले जाते. 

पण, जर तुम्ही रात्री नऊनंतर पठण कराल, तर त्याचे अधिक फायदे मिळतात. 

ब्राह्म मुहूर्तापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत बजरंगबली भगवान रामाच्या सेवेत तल्लीन असतात.

त्यामुळे या वेळेत त्यांची प्रार्थना केल्याने हवा तितका फायदा होत नाही. मात्र, रात्री नऊनंतर ते रामाच्या सेवेतून मुक्त होतात.

रात्री नऊ वाजेनंतर सुंदर कांड किंवा हनुमान चालीसाचे पठण केल्यास अनेक लाभ होतात आणि आत्म्याला शांती मिळते, असे मानले जाते.

‘या’ तारखेला जन्मलेले लोक असतात फ्लर्ट करण्यात हुशार!