...म्हणून अनुरागने अमृता सुभाषला चित्रपटातून काढलं!

All Photos: Instagram

By Harshada Bhirvandekar
Jun 18, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री अमृता सुभाष हिने आपल्या दमदार अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा निर्माण केली आहे.

मराठीच नव्हे तर, अमृता सुभाष हिने हिंदी मनोरंजन विश्वातही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला.

अमृता सुभाष हिने अनुराग कश्यप याच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

मात्र, काही काळापूर्वी त्याने अमृता सुभाष हिला आपल्या चित्रपटातून काढून टाकल्याचा खुलासा केला.

अमृता सुभाष ही अनुराग कश्यप याची आवडती अभिनेत्री आहे. मात्र, मग त्याने असं का केलं?

एका चित्रपटात कास्ट करण्यासाठी अनुराग कश्यप याने अमृताच्या मॅनेजरला फोन केला होता.

यानंतर मॅनेजरने अमृताला काहीच कल्पना न देता अवाजवी मागण्याची एक यादी अनुरागला पाठवली.

वेगळी व्हॅनिटी, कामाची वेळ, पैसे याबाबतची अवाजवी यादी वाचून अनुरागने अभिनेत्री बदलल्याचे कळवले.

अमृताने यामागचे कारण विचारताच ती घडला प्रकार तिला कळला. यांनतर तिने मॅनेजरची चांगलीच शाळा घेतली.

बिना तेलाची 'क्रीमी दाल मखनी' कशी बनवायची?