३० वर्षांनंतर पहिल्यांदाच चैत्र नवरात्रीला घडणार ‘हा’ योगायोग!

By Harshada Bhirvandekar
Apr 07, 2024

Hindustan Times
Marathi

चैत्र शुक्लपक्ष प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या चैत्र नवरात्रीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे.

चैत्र नवरात्र यावेळी ९ एप्रिलपासून सुरू होणार असून, १७ एप्रिलपर्यंत चालणार आहे. 

यंदाच्या चैत्र नवरात्रीला अतिशय शुभ मानले जात आहे, कारण यावेळी ३० वर्षानंतर एक विशेष योग तयार होत आहे. 

या चैत्र नवरात्रीला अमृतसिद्धी योग तयार होणार आहे. असे मानले जाते की, अमृतसिद्धी योगात देवी आईची पूजा केल्यानं सर्व त्रास आणि दुःखापासून मुक्ती मिळते. 

ज्योतिषशास्त्राच्या मते, नक्षत्रांमध्ये पहिले नक्षत्र हे अश्विनी नक्षत्र आहे आणि यंदा अश्विनी नक्षत्र मंगळवारी येत आहे. यालाच अमृतसिद्धी योग म्हणतात.  

अमृतसिद्धी हा योग तीस वर्षानंतर येणार असून, हा शुभ संयोग नवरात्रीच्या मुहूर्तावर घडत आहे, जो अत्यंत अद्भुत आणि फलंदायी मानला जातो. 

धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या प्रतिपदेला सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून नवीन वस्त्रे परिधान करावेत.  

व्यासपीठावर पांढरे कापड पसरून त्यावर हळद आणि कुंकू लावावे आणि अक्षतांपासून अष्टकोनी कमळ बनवावे.

त्यावर ब्रह्मदेवाची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा आणि त्याची शास्त्रोक्त पूजा करावी.

सेकंड हँड बाईक घेताना 'या' गोष्टींकडे लक्ष द्या