नॉनव्हेज नको गं बाई!  ‘हे’ कलाकार झाले शाकाहारी

By Harshada Bhirvandekar
Jul 25, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेते अमिताभ बच्चन अतिशय तंदुरुस्त आहेत. मात्र, त्यांचे यकृत केवळ २५ टक्केच काम करते. तरीही हेल्दी राहण्याचं श्रेय ते त्यांच्या शाकाहारी आहाराला देतात.

अभिनेत्री कंगना रनौत ही आधी नॉनव्हेज खात होती. पण, नंतर तिने ते सोडले. आता ती आरोग्याबाबतीत खूपच  काळजी घेते आणि शाकाहारी जेवणच जेवते. 

करीना कपूर पूर्वी खूप नॉनव्हेज खायची. मात्र, शाहिद कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये असताना या अभिनेत्रीने स्वतःला पूर्णपणे व्हेजिटेरियन बनवले. 

अभिनेत्री विद्या बालन हिला आधी मांसाहार खूप आवडायचा. मात्र, शाकाहारामुळे त्वचा चमकदार होते, असे म्हणत ती पूर्णपणे शाकाहारी झाली आहे. 

अभिनेत्री सोनम कपूर हिने देखील तिच्या ‘नीरजा’ या चित्रपटानंतर नॉनव्हेज खाणं पूर्णपणे बंद केले. 

आलिया भट्टने देखील मांसाहार पूर्णपणे सोडला आहे. उष्माघातामुळेच तिने हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.

अभिनेता जॉन अब्राहम हा आधी मांसाहार करायचा. मात्र, प्राण्यांवरील प्रेमामुळे त्याने आता नॉनव्हेज खाणं बंद केले आहे.

अभिनेता शाहिद कपूर यानेही मांसाहार पूर्णपणे सोडला आहे. एक पुस्तक वाचून शाहिदने हा निर्णय घेतला होता.

अभिनेता आमिर खान याने ही त्याच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला होता.

अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्याकडे असलेल्या कुत्र्याला नॉनव्हेजचा वास आवडत नाही, म्हणून तिने नॉनव्हेज खाणं सोडून दिलं. 

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान