तुपाने मालिश करण्याचे जबरदस्त फायदे!
By
Harshada Bhirvandekar
Jan 22, 2025
Hindustan Times
Marathi
शतकानुशतके आयुर्वेदात तुपाचा वापर केला जात आहे. खाण्याव्यतिरिक्त शरीराच्या वेगवेगळ्या भागांची तुपाने मालिश केल्याने अनेक फायदे होतात.
तुपाने मसाज करण्याचे फायदे जाणून घेऊया.
पायाला तूप लावल्याने रक्ताभिसरण सुधारते. यामुळे थकवा कमी होतो आणि चांगली झोप येण्यास मदत होते.
तुपातील फॅटी ऍसिड त्वचेला मऊ आणि मॉइश्चरायझ करते.
तुपाने नियमित मालिश केल्याने पायांची सूज आणि जळजळ यापासून आराम मिळतो.
तूप लावल्याने टाचांना भेगा पडण्याची समस्या दूर होते आणि पाय मुलायम होतात.
तुपाने पायाला मसाज केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, असे म्हणतात.
पायाला तूप लावल्याने हाडे मजबूत होतात.
टीप: ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
माघ पौर्णिमेला करा हे सोपे उपाय, वाढेल सुख-समृद्धी
पुढील स्टोरी क्लिक करा