आमलकी एकादशीच्या दिवशी करा 'हे' उपाय, श्रीमंत व्हाल!

By Harshada Bhirvandekar
Mar 20, 2024

Hindustan Times
Marathi

फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आमलकी एकादशी किंवा रंगभरी एकादशी म्हटले जाते.

या महिन्यात आज म्हणजेच २० मार्चला आमलकी एकादशी आहे. या दिवशी उपास करणाऱ्यांना मोठे फळ मिळते.

आमलकी एकादशीला भगवान शिव, माता पार्वती आणि भगवान विष्णू यांची पूजा केली जाते.

धर्मशास्त्रानुसार, भगवान विष्णूची पत्नी लक्ष्मीचा वास असणाऱ्या तुळशीची पूजा करणे शुभ मानले जाते.

या दिवशी तुळशीची पूजा करणाऱ्यांवर देवी लक्ष्मीची कृपा राहते.

रंगभरी अर्थात आमलकी एकादशीला तुळशीची पूजा करताना दिवा अवश्य लावा.

यासोबत भगवान विष्णूची पूजा करून, मंत्र जप करा. नैवेद्यात तुळशीपत्र नक्की सामील करा.

भगवान विष्णूला तुळस प्रिय आहे. म्हणून या दिवशी तुळशीची पूजा केल्याने विष्णू देखील प्रसन्न होतात.

तुळशीची पूजा करताना ११ प्रदक्षिणा घाला. यामुळे कुटुंबातील आर्थिक संकट दूर होईल.

एप्रिलचा नवा आठवडा या राशींसाठी भाग्याचा