१३ व्या वर्षी घरातून पळून गेली, आता बनली ‘मिस ट्रांस पाकिस्तान २०२३’
instagaram
By Shrikant Ashok Londhe Jun 02, 2023
Hindustan Times Marathi
पाकिस्तानची ट्रांसजेंडर अभिनेत्री अलिना खान सध्या चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर अलीना खूप सक्रीय असते.
अलिना ‘मिस ट्रांस पाकिस्तान २०२३’ बनली आहे. याची माहिती स्वत: अलिना हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
अलिनाने आपले काही फोटो शेअर करून लिहिले आहे की, एक संस्मरणीय रात्र ३१ मे २०२३
अलिनाने लिहिले आहे की, मला मिस ट्रांस पाकिस्तान २०२३ चे टायटल मिळाले आहे. मी टीमचे आभार मानते.
मी त्या कंटेस्टेट्सचेही आभार व्यक्त करते ज्यांनी माझ्यासोबत स्टेज शेअर केले होते.
मिस ट्रांस पाकिस्तान २०२३ टायटल जिंकल्यामुळे अलिनाचे फॅन्स खुश आहेत.
अलिना गेल्या वर्षी कान्स फिल्म फेस्टिवलवेळीही चर्चेत आली होती. तिचा चित्रपट जॉयलँड पहिली पाकिस्तानी फिल्म बनली होती जी आंतरराष्ट्रीय प्लेटफॉर्मवर स्क्रीन झाली होती.
अलिनाला या चित्रपटासाठी स्टँडिंग ओवेशन मिळाले होते. मात्र इथपर्यंत पोहोचण्यासाठी अलिनाने कुटूंबाकडून अनेक गोष्टी सहन केल्या होत्या.
Instagram
अलिनाने एका मुलाखतीत म्हटले होते की, ती १३ वर्षाची असताना घरातून पळून गेली होती. तिचे कुटूंबीय तिला मारहाण करत होते. आज अलिनाचे कुटूंबीयांशी नाते संपले असले तरी तिचे फिल्मी करिअर शिखरावर पोहोचले आहे.