आलिया भट्टच्या ‘रामायण’ साडीची किंमत ऐकलीत का?

By Harshada Bhirvandekar
Jan 24, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सिल्कची साडी नेसली होती. 

या साडीचे वैशिष्ट्य म्हणजे साडीच्या पदरावर 'रामायण' कथा रुपात चितारण्यात आले होते. 

आलिया भट्टची ही खास साडी तयार करण्यासाठी दोन कारागिरांनी तब्बल १० दिवस सातत्याने काम केले.

आलियाच्या या साडीची किंमत तब्बल ४५,००० रुपये आहे. आलियाची ही साडी लोकांना खूप आवडली आहे.

आलिया भट्टच्या या खास साडीवर ‘रामायणा’तील शिवधनुष्य मोडण्यापासून ते राज्याभिषेकापर्यंतची कथा होती.

आलिया भट्टने राम मंदिराच्या उद्घाटनासाठी कर्नाटकातील म्हैसूर सिल्कची साडी नेसली होती.

या साडीच्या पदरावर रामायणात वर्णन केलेल्या काही महत्त्वाच्या क्षणांचे चित्रण पाहू शकता. 

आलिया भट्टच्या या साडीने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. तर, रणबीर कपूरही छान दिसत होता.

अमेरिकेत राष्ट्रपती रिटायर झाल्यावर काय काय सुविधा मिळतात ?