अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय  

By Rohit Bibhishan Jetnavare
May 08, 2024

Hindustan Times
Marathi

सनातन धर्मात अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते.

तसेच, अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी केले जाते. हा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो.

यंदा अक्षय्य तृतीया १० मे रोजी आहे. अक्षय्य तृतीयेला स्वयंसिद्ध मुहूर्त असेही म्हणतात. या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ असते.

पण सोने आणि महागडी वस्तू खरेदी करणे सर्वांसाठी शक्य नसते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रात एक उपाय सांगण्यात आला आहे.

जर तुम्ही अक्षय्य तृतीयेला कोणतीही महागडी वस्तू खरेदी करू शकत नसाल तर बाजारातून थोडी कोथिंबीर जरूर खरेदी करा. 

बाजारात ५ रुपयांना कोथिंबीर किंवा धने सहज मिळते. ज्योतिषशास्त्रात धणे हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.

अक्षय्य तृतीयेला धन्याचे काही उपाय विशेष लाभ देतात. 

अक्षय्य तृतीयेला संध्याकाळी धने ठेऊन लक्ष्मीची पूजा करा. नंतर सकाळी हे धने बागेत टाका किंवा झाडांच्या कुंडीत टाका, धनलाभ होईल.

अक्षय्य तृतीयेला खरेदी केलेल्या धन्याची पूजा केल्यानंतर ते घरात ठेवा. ७ दिवसानंतर गाईला खाऊ घाला. आर्थिक स्थिती मजबूत होईल.  

‘भंवर सिंह शेखावत’कडे एकूण किती संपत्ती आहे?