टीव्हीची ‘अक्षरा बहु’ हिना खान कितवी शिकलीय?
By
Harshada Bhirvandekar
Sep 03, 2024
Hindustan Times
Marathi
टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान हिने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत अक्षरा बहुची भूमिका साकारली होती.
या भूमिकेने तिला घराघरांत ओळख मिळवून दिली. हिनाने या भूमिकेतून उत्कृष्ट अभिनय केला होता.
सध्या हिना खान ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे. या दरम्यान ती चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असते.
हिना खाने तिचे सुरुवातीचे शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणाहून केले आहे. तिने जम्मू, श्रीनगर, लखनऊ येथून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर हिना खान दिल्लीला आली आणि येथील गार्गी महाविद्यालयातून तिने वाणिज्य शाखेतील पदवी घेतली.
हिनाने गुरुग्रामच्या कर्नल सेंटर अकादमी स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए देखील पूर्ण केले आहे.
हिनाला गाण्याची आवड असून, २००८ मध्ये तिने ‘इंडियन आयडल’साठी ऑडिशन दिलं होतं, हे फार कमी लोकांना माहीत आहे.
हिनाने कधीच अभिनेत्री होण्याचा स्वप्न पाहिलं नव्हतं. मात्र, एका टीव्ही सिरीयलच्या ऑडिशनसाठी ती अचानक पोहोचली होती.
तिने ऑडिशन दिले आणि ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतील अक्षराची भूमिका तिला मिळाली.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा