मराठमोळ्या अजिंक्य रहाणेचं टीम इंडियात पुनरागमन!

By Atik Sikandar Shaikh
Apr 25, 2023

Hindustan Times
Marathi

जून महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चँम्पियनशिपच्या फायनलसाठी अजिंक्य रहाणेची टीम इंडियात निवड करण्यात आली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून खराब फॉर्ममुळे रहाणे भारतीय संघापासून दूर होता.

यंदाच्या आयपीलमध्ये अजिंक्यने विस्फोटक फलंदाजी करत अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अजिंक्य रहाणे हा भारताचा स्टार कसोटीपटू म्हणून ओळखला जातो. चिवट फलंदाजी करत खेळपट्टीवर वेळ घालवण्यासाठी तो प्रसिद्ध आहे.

रहाणेला इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव असल्यामुळंच त्याची कसोटी विश्वचषकाच्या फायनलसाठी निवड झाल्याचं बोललं जात आहे.

भारतासह अनेक विदेशी खेळपट्ट्यांवर रहाणेने संयमी खेळी करत स्वत:ला परफेक्ट कसोटीपटू म्हणून सिद्ध केलं आहे.

अजिंक्य रहाणेचं भारतीय संघात समावेश झाल्यामुळं भारतीय संघाला डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये मोठा फायदा होणार आहे.

विचारांनी मजबूत लोक या गोष्टी करत नाहीत!