अभिनेत्री ऐश्वर्या राय आजही खूप सुंदर दिसते तिचे लाखो चाहते आहे. ऐश्वर्या गेली अनेक वर्षे अभिनयाच्या जगात सक्रिय आहे.
ऐश्वर्या रायचे असे अनेक फोटो आहेत, जे कधी समोरही आले नसतील. या फोटोंमध्ये ऐश्वर्या खूपच सुंदर दिसते.
ऐश्वर्या रायला पाहिल्यानंतर तिचा प्रत्येक चाहता म्हणतो की, देवाने तिला खूप वेळ घेऊन बनवलं आहे. तिचे निळे डोळे, सुंदर चेहरा तिच्या सौंदर्याला चार चांद लावतात.
ऐश्वर्या राय लहानपणापासूनच अभिनयाच्या जगात प्रवेश केला होता. तिने लहानपणी एका पेन्सिलची जाहिरात केली होती.
ऐश्वर्या राय अभ्यासातही चांगली होती. तिला जीवशास्त्र विषय खूप आवडायचा. जर, ऐश्वर्या राय अभिनेत्री झाली नसती, तर ती नक्कीच डॉक्टर झाली असती.
१९९४ मध्ये ऐश्वर्या रायने ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकला आणि त्यानंतर तिने मॉडेलिंगच्या जगात प्रवेश केला.
ऐश्वर्याने मणिरत्न यांच्या ‘इरुवर’ या चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. त्याच वर्षी ऐश्वर्याने ‘और प्यार हो गया’ या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं.
ऐश्वर्या रायने आजवर अनेक बॉलिवूड चित्रपटांसोबतच हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यावेळी परदेशात ठसा उमटवणारी ऐश्वर्या ही पहिली भारतीय अभिनेत्री होती.
२००७ मध्ये अभिषेक बच्चन सोबत लग्न करून ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबाची सून बनली.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान