तेजश्री प्रधानला अभिनयात नाही तर ‘या’ क्षेत्रात करायचं होतं काम!

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Apr 11, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने आपल्या अभिनयाने सगळ्यांचे मन जिंकून घेतले आहे. 

Photo: Instagram

‘या गोजिरवाण्या घरात’पासून सुरू झालेला तिचा प्रवास आता ‘प्रेमाची गोष्ट’पर्यंत पोहोचला आहे. 

Photo: Instagram

तेजश्री प्रधानने अनेक नाटकं, मालिका आणि चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. 

Photo: Instagram

अभिनय विश्वात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या तेजश्री प्रधान हिला कधीच अभिनेत्री व्हायचे नव्हते. 

Photo: Instagram

तेजश्री प्रधान ही अभिनेत्री नसती, तर एक कॉऊन्सिलर असती, हे नक्की. याचा खुलासा स्वतः तिने केला आहे.

Photo: Instagram

आपल्या करिअर विषयी बोलताना तेजश्री म्हणाली की, मला प्रत्येक वेळी काहीतरी वेगवेगळं व्हावं, असं वाटायचं.

Photo: Instagram

कॉलेज पूर्ण झाल्यावर आपण जर्मन भाषा शिकावी, असं वाटत असल्याने जर्मन भाषेचा कोर्स करून ट्रान्सलेटर व्हायचं तिने ठरवलं होतं. 

Photo: Instagram

मात्र, काळाप्रमाणे पुढे जाताना सायकॉलॉजी या विषयात तिची रुची वाढू लागली होती, म्हणून आपण सायकॉलॉजी शिकून सायकलॉजिस्ट बनावं, असंही तिला वाटत होतं.  

Photo: Instagram

मात्र, या सगळ्यात कुठेच अभिनय करावा किंवा अभिनेत्री बनावं, हे तिच्या यादीतही नव्हतं.

Photo: Instagram

अभिनेत्रीने बोल्डनेसच्या मर्यादा ओलांडल्या, चाहत्यांना थंडीत फोडला घाम