अजय देवगणमुळे आजन्म अविवाहित राहिली तब्बू!

By Harshada Bhirvandekar
Jun 15, 2024

Hindustan Times
Marathi

अजय देवगण हा बॉलिवूडचा एक दमदार हिरो आहे. अनेक वर्षांपासून तो चित्रपटसृष्टीवर राज्य करत आहे. आजही त्याचे चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करतात.  

अभिनेत्री तब्बू देखील अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीचा एक अविभाज्य भाग आहे. तिने नेहमीच दमदार भूमिका साकारल्या आहेत. आजही तिला पडद्यावर पाहायला लोकांना फार आवडते.  

अजय देवगण आणि तब्बू अनेक वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत, हे सर्वांनाच माहित आहे. पण, अजय मुळे तब्बू अविवाहित राहिली आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? 

तब्बू अनेकदा अजय आणि तिच्या मैत्रीची किस्से सांगत असते. अजय देवगणच्या एका कृतीमुळे ती आजपर्यंत सिंगल असल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.  

तब्बूचा मित्र अजय हा तिचा चुलत भाऊ समीर आर्यचाही अतिशय जवळच मित्र होता. दोघे मिळून नेहमी तब्बूचा पाठलाग करायचे आणि तिच्यावर नजर ठेवायचे.  

तब्बू म्हणाली की, ती कोणत्याही मुलाला भेटली किंवा कोणाशी बोलली की, हे दोघे त्याला धमकवायचे. त्यामुळे तो मुलगा पुन्हा तिच्याशी बोलायचाच नाही.  

तब्बू म्हणाली की, मी अजूनही सिंगल आहे, तर ते केवळ अजय देवगनमुळेच... मला वाटतं आता त्याला त्याचा नक्कीच पश्चाताप होत असेल.  

तब्बूचे नाव अनेक अभिनेत्यांशी जोडले गेले होते. पण तिने आजपर्यंत लग्न केलेले नाही. दुसरीकडे, अजय काजोलसोबत लग्न करून संसारात रमला असून, त्याला दोन मुले देखील आहेत.  

मात्र, तब्बू नेहमी म्हणते की, माझा कोणावर सर्वात जास्त विश्वास असेल तर तो अजय देवगण आहे.  

अजय देवगण आणि तब्बू यांचा पुढचा चित्रपट ‘औरो मे कहाँ दम था’ हा ५ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून, पुन्हा एकदा दोघे रोमान्स करताना दिसणार आहेत.

ही फळं त्वचेला देतात चमक

Pexels