सुष्मिता सेनने नाकारले 'हे' गाजलेले चित्रपट!

By Harshada Bhirvandekar
Dec 11, 2024

Hindustan Times
Marathi

माजी 'मिस युनिव्हर्स' अभिनेत्री सुष्मिता सेनने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

मात्र, तिने बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या काही चित्रपटांच्या ऑफर्स नाकरल्या. 

गदर : सुष्मिता सेन हिने सनी देओलसोबतचा 'गदर' हा चित्रपट नाकारला होता. नंतर हा चित्रपट अमिषा पटेलकडे गेला. 

आप : अनिल शर्मा यांच्या 'आप' या स्पोर्ट्स ड्रामाची ऑफर सुष्मिता सेनला मिळाली होती. मात्र, तिने नाकारल्यावर शिल्पा शेट्टीकडे गेली. 

गोल्डन आय : सुष्मिता सेनने पियर्स ब्रोन्सनची प्रसिद्ध 'जेम्स बॉण्ड' चित्रपट सीरिज नाकारली होती. 

ऐतराज : सुष्मिता सेनने खुलासा केला की, अक्षय कुमार आणि करीना कपूर यांच्यासोबतचा एक चित्रपट नाकारलेला. त्यावेळी तिची मुलगी आजारी होती.

जख्म : विक्रम भट्ट यांच्या 'जख्म' या चित्रपटात सुष्मिता सेन झळकणार होती. मात्र, हा चित्रपट डब्यात गेला.

सुष्मिता सेनने तिच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट केले, ज्यात 'मै हू ना', 'बीवी नंबर वन', 'मैने प्यार क्यूं किया' यांचा समावेश आहे.

अ‍ॅमेझॉनवर सार्ट टीव्ही अर्ध्या किंमतीत उपलब्ध

Pexels