उदरनिर्वाहासाठी लोकांच्या घरी धुणी-भांडी करायच्या सुप्रिया पाठारे!

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Mar 11, 2024

Hindustan Times
Marathi

असं म्हणतात आयुष्यात संघर्ष हा कुणालाच चुकलेला नाही. प्रत्येकाला संघर्ष हा करावाच लागतो.

Photo: Instagram

अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांना देखील आयुष्यात असाच संघर्ष करावा लागला होता.

Photo: Instagram

आपल्या दमदार विनोदी अभिनयाने सगळ्यांना खळखळवून हसवणाऱ्या सुप्रिया पाठारे यांनी खूप कष्ट केले.

Photo: Instagram

घरात भावंडांमध्ये सगळ्यात मोठ्या असणाऱ्या सुप्रिया पाठारे यांना घराची जबाबदारी देखील होती.

Photo: Instagram

घरातील सगळ्यात मोठी लेक असल्याने घर सांभाळण्यासाठी पडेल ते काम करावे लागत होते.

Photo: Instagram

सुप्रिया पाठारे यांना शिकून पोलीस अधिकारी व्हायचं होतं. पण, परिस्थितीमुळे शक्य झालं नाही.

Photo: Instagram

वेळेप्रसंगी घर चालवण्यासाठी सुप्रिया पाठारे यांनी लोकांच्या घरी धुणी-भांडी देखील केली होती.

Photo: Instagram

इतकंच नाही तर, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सुप्रिया अंडी आणि चणे देखील विकायच्या.

Photo: Instagram

अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आता सुप्रिया पाठारे महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनामध्ये पोहोचल्या आहे.

Photo: Instagram

रोज बदाम खाण्याचे आहेत ‘६’ मोठे फायदे!

pixabay