पुरा लंडन ठुमकदा...  श्रेया बुगडेचा परदेशात जलवा

All Photos: Instagram

By Harshada Bhirvandekar
May 23, 2024

Hindustan Times
Marathi

‘चला हवा येऊ द्या’ या कथाबाह्य कार्यक्रमातून अभिनेत्री श्रेया बुगडे हिने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं.

सध्या अभिनेत्री श्रेया बुगडे ही लंडनला गेली आहे. याची झलक ती आपल्या फोटोंमधून दाखवत आहे.

आपल्या दमदार विनोदी अभिनयाने श्रेय बुगडे हिने केवळ महाराष्ट्रच नाही तर, जगभरात आपलं नाव गाजवलं.

सध्या एका शोच्या निमित्ताने आपल्या टीमसोबत लंडनला पोहोचलेल्या श्रेयाने भटकंती देखील केली आहे.

या ट्रीपचे काही खास फोटो श्रेयाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

श्रेया बुगडे हिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती लंडनमधील काही प्रसिद्ध ठिकाणी भेट देताना दिसली आहे.

तर, हिरव्या रंगाचा वन पीस ड्रेस आणि त्यावर ट्रेंच कोट या अवतारात ती खूप सुंदर दिसत आहे.

श्रेया बुगडे हिने हे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करताच त्यावर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे.

या लंडनवारी दरम्यान कामातून वेळ काढून तिने या सुंदर शहरात भटकंती देखील केली आहे.

‘बिग बॉस ओटीटी ३’च्या घरात एन्ट्री करणारी शिवानी कुमारी आहे तरी कोण?

All Photos: Instagram