हाय हाय मिरची... लाल ड्रेसमध्ये सई ताम्हणकरचा बोल्ड अंदाज!

All Photos: Instagram

By Harshada Bhirvandekar
May 30, 2024

Hindustan Times
Marathi

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंज केले आहे.

मराठी चित्रपट, मालिका आणि वेब सीरिजच्या माध्यमातून सई ताम्हणकर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.  

तर हिंदीमध्ये देखील तिने आपला जलवा दाखवला आहे. बॉलिवूडच्या वेब सीरिज आणि चित्रपटात सई झळकली आहे.

काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील सई ताम्हणकर हिने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.  

सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारी सई ताम्हणकर नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. 

नुकतेच तिने काही लाल ड्रेसमधील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

लाल रंगाचं क्रॉप टॉप आणि लाल रंगाचा हायस्लीट स्कर्ट परिधान केला आहे. या आऊटफिटमध्ये सई ताम्हणकर कमालीची बोल्ड दिसत आहे.  

सई ताम्हणकर नेहमीच तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते. तिच्या फॅशनला चाहत्यांची देखील पसंती मिळते.  

या लाल रंगाच्या आऊटफिटसोबत तिने काळ्या रंगाचे हाय हिल्स आणि बेसबॉल कॅप परिधान केली आहे.  

‘बिग बॉस ओटीटी ३’च्या घरात एन्ट्री करणारी शिवानी कुमारी आहे तरी कोण?

All Photos: Instagram