नुकतीच एका नोकरीच्या जाहिरातीत मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये, असं म्हटल्याने चांगलाच गदारोळ माजला होता.
या जाहिरातीवरून चांगलाच वाद देखील निर्माण झाला होता. यानंतर विविध स्तरातून या जाहिरातीवर जोरदार टीका करण्यात आली.
टीका झाल्यानंतर संबंधित व्यक्तींनी माफी देखील मागितली. मात्र, आता याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी केलेली एक पोस्ट व्हायरल होत आहे.
अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी मराठी माणसाबरोबर दुजाभाव करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे.
रेणुका शहाणे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, मराठी नॉट वेलकम म्हणणाऱ्या लोकांना कृपया मत देऊ नका.
मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका, असंही त्यांनी म्हटलं आहे.
ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं, अशा लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका!
यापुढे त्यांनी आपली भूमिका देखील स्पष्ट केली आहे. ‘मी कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध नाही.’
‘पण जे आपल्या महाराष्ट्रात आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाही अशा लोकांना शांतपणे मत न देता त्यांची चूक दाखवून दिली पाहिजे’, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
आता रेणुका शहाणे यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यांच्या या भूमिकेवर चाहते कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान