प्राजक्ता माळीचं नव्या क्षेत्रात पदार्पण!
All Photos: Instagram
By
Harshada Bhirvandekar
May 16, 2024
Hindustan Times
Marathi
आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांचा मन जिंकून घेणारी सध्याची आघाडीची अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.
प्राजक्ता माळीने केवळ अभिनयच नाही, तर सूत्रसंचालन, कवयित्री आणि उद्योजिका म्हणूनही आपलं नाव गाजवलं.
प्राजक्ता माळी नेहमीच काही ना काही तरी वेगळं करताना दिसते. तिच्या प्रत्येक कामाचं चाहते तोंड भरून कौतुक करताना दिसतात.
अभिनयाबरोबरच इतर अनेक क्षेत्रात आपलं नाव गाजवणारी प्राजक्ता आणखी एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी आता एका मराठी चित्रपटाची निर्मिती म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
निर्माती म्हणून प्राजक्ता माळी हिने तिच्या पहिल्या नव्याकोऱ्या चित्रपटाची घोषणा नुकतीच केली आहे.
‘फुलवंती’ या चित्रपटातून निर्माती म्हणून प्राजक्ता माळी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे.
‘पेशवे युग, नृत्य आणि संगीताची जादू तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आता आणखी वाट बघू शकत नाही’, असं म्हणत तिने आपल्या पहिल्या चित्रपटाची घोषणा केली.
प्राजक्ताच्या या घोषणेनंतर मराठी कलाविश्वातून अनेक कलाकार मंडळींनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा