मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये नेहा पेंडसे या गुणी अभिनेत्रीचा समावेश होतो.
@nehhapendse/IG
अनेक चित्रपट आणि मालिकांमधून नेहा पेंडसे घराघरात पोहोचली. नेहा नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमांमधून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.
@nehhapendse/IG
परंतु नेहाची अशी एक गोष्ट आहे, जी तिच्या चाहत्यांना अजूनही माहित नाही आणि ती गोष्ट म्हणजे नेहा सहा गोंडस मुलांची आई आहे.
@nehhapendse/IG
'पटलं तर घ्या विथ जयंती' या टॉकशोमध्ये नेहाने सहा गोंडस मुलांची आई असल्याची कबूली दिली.
@nehhapendse/IG
आता नेहाची ही क्युट मुलं कोण आहेत आणि हे नेमकं काय प्रकरण आहे, याचे उत्तर तुम्हाला येत्या शुक्रवारी म्हणजेच १७ मार्च रोजी प्लॅनेट मराठी ओटीटीवर मिळणार आहे.
@nehhapendse/IG
नेहाने जानेवारी २०२० मध्ये बॉयफ्रेंड शार्दूलशी लग्न केले. त्यानंतर त्याच्यासोबत नरिमन पॉईंट ते नायगाव चक्क हेलिकॉप्टरने प्रवास केला होता.
@nehhapendse/IG
आता अशा प्रवासाचे नेमके कारण काय, याचेही उत्तर तिने या टॉकशो मध्ये दिले आहे.