लेखिका म्हणून मधुरा वेलणकर-साटमचा पहिला पुरस्कार!
By
Harshada Bhirvandekar
Jun 17, 2024
Hindustan Times
Marathi
चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची मोहोर उमटवणाऱ्या अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम हिने अगदी सहजच लेखन क्षेत्रातही पाऊल टाकलं.
तिचे पहिलवहिले लेखिका म्हणून असलेले ‘मधुरव' पुस्तकही अल्पावधीतच लोकप्रिय ठरले.
मधुरा ही चार राज्य पुरस्कारांची आणि इतर अनेक पुरस्कारांची मानकरी ठरलेली एक चतुरस्र अभिनेत्री म्हणून आपल्याला परिचित आहे.
नाट्य-चित्रपट-अभिनय शिबिरं-कार्यशाळा अशा नानाविध माध्यमांतून गेल्या दोन दशकांहून अधिक काळ अभिनयाच्या क्षेत्रात ती घोडदौड करतेय.
सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या हस्ते नुकताच अभिनेत्री, लेखिका मधुरा वेलणकर साटमला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
"मधुरव" या रसिक आंतरभारती प्रकाशित पुस्तकासाठी यंदाचा "मनोरमा साहित्य सेवा पुरस्कार" तिला देण्यात आला.
राज्यस्तरीय पुरस्कार-मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक, आणि रोख एकवीस हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.
विविध पुरस्कारांनांतर लेखनाकरिता मिळालेल्या या पुरस्काराचे मोल हे नक्कीच विशेष आहे.
हे पुस्तक नवीन ऊर्जा देणारे असल्याचे अभिनेत्री,लेखिका मधुरा वेलणकर साटम हिने सांगितले.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा