एक लाजरान् साजरा मुखडा... जुई गडकरीच्या अदा बघाच!

By Harshada Bhirvandekar
May 30, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री जुई गडकरी सध्या तिच्या मालिकेमुळे प्रचंड चर्चेत आहे.

जुई गडकरी ‘ठरलं तर मग’ या मालिकेमध्ये ‘सायली’ची भूमिका साकारताना दिसत आहे.  

तिच्या ‘सायली सुभेदार’ या भूमिकेला आणि पात्राला प्रेक्षकांनी चांगलंच डोक्यावर उचलून धरलं आहे.  

निरागस सौंदर्य, सालस स्वभाव आणि शांत चेहरा यामुळे जुई गडकरी सगळ्यांचीच लाडकी बनली आहे.  

‘पुढचं पाऊल’ या मालिकेमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेल्या जुई गडकरीने आता त्यांच्या मनात हक्काचे स्थान मिळवले आहे.  

अभिनेत्री जुई गडकरी सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपले फोटो आणि काही व्हिडीओ शेअर करताना दिसते.  

नुकतेच तिने हिरव्या रंगाच्या अनारकली सूटमधील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  

या फोटोमध्ये जुई गडकरी कमालीची सुंदर दिसत आहे. सुंदरशी हेअर स्टाईल आणि अतिशय हलकासा मेकअप करून जुई गडकरीने चाहत्यांची मन घायाळ केली आहेत.  

यातच तिच्या चेहऱ्यावरच्या बटा आणि सुंदर हास्य यांनी सगळ्यांनाच मोहित केले आहे. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

All Photos: Instagram

गरोदर महिलांनी आपल्या आहाराबाबत खूप काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने त्यांना अनेक फायदे होतात.

गरोदर महिलांसाठी भोपळ्याच्या बिया खूप फायदेशीर!

Unsplash