लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहचली ईशा मालवीय!
By Harshada Bhirvandekar
Sep 12, 2024
Hindustan Times
Marathi
सध्या सगळीकडेच वेगवेगळ्या गणपती बाप्पांची आणि मंडळांची जोरदार चर्चा आहे.
मुंबईतही काही बाप्पांच्या दर्शनासाठी सेलिब्रिटी मोठी रांग लावत असतात. यापैकीच एक गणपती म्हणजे लालबागचा राजा.
लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी वेगवेगळे सेलिब्रिटी येत असतात.
‘बिग बॉस १७’ फेम फिल्म अभिनेत्री ईशा मालवीय हिने देखील लालबागच्या राजाच्या चरणी हजेरी लावली आहे.
अभिनेत्री नुकतीच पारंपारिक कपडे परिधान करून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचली होती.
यावेळी ईशा मालवीय हिने परिधान केलेला ड्रेस हा अतिशय सुंदर दिसत होता.
ईशा मालवीय हिने ‘उडारीया’ या मालिकेतून घराघरात लोकप्रियता मिळवली होती.
त्यानंतर ती ‘बिग बॉस १७’मध्ये देखील झळकली होती. अनेक म्युझिक व्हिडिओजमध्ये देखील तिने काम केले आहे.
श्वेता तिवारीने ‘असा’ साजरा केला ४४वा वाढदिवस!
पुढील स्टोरी क्लिक करा