१३२ किलोवरून थेट ७१; मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखणंही कठीण!

By Harshada Bhirvandekar
Jun 01, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड, हॉलिवूड असो वा मराठी कलाकार मंडळी त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसतात. 

बरेचदा ही कलाकार मंडळी योग, जिमचे अनेक गोष्टी करतात आणि त्याचे व्हिडीओ शेअर करताना दिसतात. 

सुरुवातीच्या काळात फिटनेसची क्रेझ तितकी नव्हती, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी प्रयत्नही करताना दिसत नव्हते. 

बऱ्याच अभिनेत्रींची गेल्या काही काळात त्यांच्या वजनात कमालीची घट केली आहे. 

या अभिनेत्रींमध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्रीचे नाव आवर्जून घेतले जाईल ते म्हणजे आरती सोलंकी. 

तब्बल ६१ किलो वजन कमी करत या आरतीने वजन कमी करण्याचा रेकॉर्डच ब्रेक केला आहे. 

आरती सोलंकीने स्वतःमध्ये केलेल्या या बदलामुळे तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

नाटक, मराठी चित्रपट, मालिका यांमधून आजवर आरतीने तिच्या अभिनयाची छाप सोडली.

अनेक अडचणींचा सामना करत खचून न जाता अगदी जिद्दीने तिने तिचा हा प्रवास पूर्ण केला.

घरात गंगाजल ठेवलंय? मग करू नका ‘या’ चुका!