श्रीमंत होण्यासाठी या ५ गोष्टी करा  

By Rohit Bibhishan Jetnavare
Apr 09, 2024

Hindustan Times
Marathi

आचार्य चाणक्य यांनी पती-पत्नीचे नाते, मैत्री, धर्म, कर्म आणि पैसा यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी आपल्या नीतिशास्त्रात नमूद केल्या आहेत. 

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, जर एखाद्याला श्रीमंत व्हायचं असेल तर त्याने नेहमी या ५ गोष्टींची काळजी घ्यावी. 

१) चाणक्य यांच्यानुसार, माणसाने नेहमी अशा ठिकाणी राहावे, जिथे सतत प्रगती होत असते, शिक्षण आणि औषधाची योग्य व्यवस्था असते.

तसेच ज्या क्षेत्रात सन्माननीय लोक राहतात, अशा ठिकाणी राहिल्याने माणूस लवकर अडचणीत येत नाही.

२) जर एखाद्याला जीवनात श्रीमंत व्हायचं असेल तर त्याने कधीही पैशाचा लोभी होऊ नये. कारण अनेक वेळा त्याला चुकीच्या गोष्टी करायला प्रवृत्त करतो.

३) माणसाने नेहमी दान करत राहावे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या उत्पन्नातील काही भाग गरजूंना दान करू शकता. यामुळे लक्ष्मी प्रसन्न होतो.

४) चाणक्य सांगतात, की ध्येयहीन व्यक्ती आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाही. 

अशा परिस्थितीत जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुमच्या आयुष्यात काहीतरी ध्येय निश्चित करा.

५) माणूस कितीही श्रीमंत झाला तरी त्याने नेहमी संपत्ती जतन केली पाहिजे. कारण हा जमा केलेला पैसा वाईट काळात माणसाला उपयोगी पडतो. 

कारण, वाईट काळ आणि आजार माणसाच्या आयुष्यात कधीही दार ठोठावू शकतात.

सैफ अली खान डिस्चार्जनंतर फिट अँड फाईन, नवाबासारखी एंट्री