अस्वच्छ कपडे घालणारे, घाणेरडे दात असलेले, खूप खाणारे, कठोर बोलणारे आणि सूर्योदय-सूर्यास्ताच्या वेळी झोपणाऱ्यांपासून लक्ष्मी लांब राहते, ते स्वयं श्रीविष्णू का नसो.
गरुड पुराणानुसार, घाणेरडे कपडे घालणाऱ्या व्यक्तिंवर लक्ष्मी प्रसन्न होत नाही. त्यामुळे दररोज स्नानानंतर स्वच्छ कपडे घातले पाहिजे.
घाणेरडे दात तुमच्या व्यक्तिमत्वाला कलंकित करत नाहीत तर ते तुमच्या आरोग्यालाही हानी पोहचवतात. देवी लक्ष्मीही घाणेरडे दात असलेल्यांवर अवकृपा करते.
जास्त जेवण करणेही आरोग्याला हानी पोहचवते. गरुड पुराणानुसार खूप खाणाऱ्यांवरही लक्ष्मी कृपा होत नाही.
गरुड पुराणानुसार सूर्योदय झाल्यानंतर उशीरापर्यंत झोपल्यास किंवा सूर्यास्ताच्या वेळी झोपल्याने लक्ष्मी प्रसन्न होत नाही.
कठोर बोलणारे किंवा इतरांसोबत कठोर वागणाऱ्यांवरही लक्ष्मी रागावते. अशात लहान-मोठ्या लोकांसोबत प्रेमाने आणि आदराने वागावे.
डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.