ज्योतिषशास्त्रानुसार चुकूनही या गोष्टी भेट म्हणून देऊ नये
By
Priyanka Chetan Mali
Dec 29, 2024
Hindustan Times
Marathi
कोणत्याही खास क्षणाला लोकं आपल्या प्रियजणांना भेटवस्तू देतात, अशी परंपरा शतकानुशतकांपासून चालू आहे.
पण शास्त्रानुसार कोणतीही भेटवस्तू देण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, अन्यथा त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.
जाणून घ्या ज्योतिषशास्त्रानुसार कोणकोणत्या गोष्टी भेटवस्तू म्हणून कधीही कोणाला देऊ नये.
अनेकांना आपल्या मित्रांना देवी-देवतांच्या मूर्ती भेट म्हणून द्यायला आवडतात.
पण ज्योतिषशास्त्रानुसार देवी-देवतांच्या मूर्ती कोणालाही भेट म्हणून देणे टाळावे.
कारण भेटवस्तू घेणारा व्यक्ती त्या मुर्तींची आवश्यक काळजी घेण्यास सक्षम असेलच असे नाही. अशा परिस्थितीत देणाऱ्याला दोष लागु शकतो.
पाण्याशी संबंधित वस्तू कोणालाही भेट म्हणून देऊ नये. ज्योतिषशास्त्रानुसार पाण्याचे तत्व भाग्याशी जोडलेले आहे.
भेट म्हणून रूमालही देऊ नये. ज्योतिषशास्त्रानुसार, भेटवस्तू म्हणून रूमाल प्राप्त करणाऱ्या व्यक्तीच्या मनावर निराशेचे प्रभुत्व सुरू होते.
बुट, चप्पल किंवा बॅग भेट म्हणून देऊ नयेत.बुट आणि चप्पल भेट म्हणून दिल्यास नात्यात दुरावा येतो आणि बॅग दिल्याने आर्थिक नुकसान होऊ शकते.
डिस्क्लेमर : ही माहिती केळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.
पूर्वमुखी घर असेल तर या गोष्टींची घ्या विशेष काळजी
पुढील स्टोरी क्लिक करा