अपघातापूर्वी ‘अशी’ दिसायची ‘आशिकी गर्ल’ अनु अग्रवाल!

By Harshada Bhirvandekar
Aug 17, 2024

Hindustan Times
Marathi

'आशिकी' चित्रपटातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अनु अग्रवाल हिने आपल्या सौंदर्याने सगळ्यांची मने जिंकली होती.

अनु अग्रवालने आपल्या दमदार अभिनयाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. तिच्याकडे चित्रपटांच्या रांगा लागल्या होत्या. 

९०च्या दशकांत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत अनु अग्रवालचे नाव सामील होते.

पण, तिच्या आयुष्यात एक असा दिवस आला, ज्याने तिचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले. १९९९मध्ये तिचा गंभीर अपघात झाला.

या अपघातात अनु अग्रवालची अनेक हाडे तुटली, तिचा चेहरा विद्रूप झाला आणि ती कोमातही गेली.

३० दिवस कोमात राहिल्यानंतर अनु अग्रवालला काहीच आठवत नव्हते. तिला अर्धांगवायु देखील झाला होता.

अनु अग्रवाल कधीच चालू शकणार नाही, असे वाटत होते. मात्र, तिने स्वतः कधी हिंमत हरली नाही.

अपघातात अनु अग्रवालचा चेहरा विद्रूप झाला होता. तिने सर्जरीही केली. मात्र, ती यशस्वी झाली नाही.

अनु अग्रवालला अजूनही चित्रपटात काम करायचे आहे, मात्र आता तिच्याकडे काहीच काम नाही.

मात्र, सोशल मीडियावर अनु खूप सक्रिय आहे आणि ती आपले योग व्हिडीओ शेअर करत असते.

स्प्लिट एंडची समस्या दूर करण्यासाठी घरगुती हेअर मास्क

freepik