‘आई तुळजाभवानी’ फेम अभिनेत्रीच्या ग्लॅमरस अदा
Instagram
By
Shrikant Ashok Londhe
Dec 20, 2024
Hindustan Times
Marathi
‘कलर्स मराठी’ वाहिनीवर ‘आई तुळजाभवानी’ नवी मालिका सुरू झाली आहे.
या मालिकेतील ‘आई तुळजाभवानी’चे पात्र अभिनेत्री पूजा काळेने साकारलं आहे.
‘आई तुळजाभवानी’च्या रुपात प्रसन्न व देखणे रूप पूजाने साकारले आहे.
पूजा भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने कथ्थकचंही शिक्षण घेतलं आहे.
पहिली मालिका आणि आव्हानात्मक भूमिका साकारणं ही एक मोठी जबाबदारी असल्याचे पूजा म्हणते.
‘आई तुळजाभवानी’चं अद्भुत,अलौकिक रूप या मालिकेत पाहायला मिळत आहे.
पूजा काळेचा जन्म व संपूर्ण जडणघडण कल्याण शहरात झाली आहे.
पूजाला कलेचा वारसा कुटूंबाकडून मिळालेला असून तिची आई व बहिणी भरतनाट्यम नृत्यांगना असून त्या विशारद आहेत.
पूजाची ‘आई तुळजाभवानी’साठी ४०० मुलींमधून व इन्स्टाग्रामच्या माध्यातून निवड झाल्याचे सांगितले जाते.
झणझणीत मिरचीचा ठेचा कसा बनवायचा?
पुढील स्टोरी क्लिक करा