‘आशुतोष केळकर’ आता काय करतो?

All Photos: Instagram

By Harshada Bhirvandekar
Apr 29, 2024

Hindustan Times
Marathi

मराठी मालिका विश्वात ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

या मालिकेतील प्रत्येक पत्राला देखील प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.

‘आशुतोष केळकर’ हे देखील या मालिकेतील लोकप्रिय पात्रांपैकी एक होते.

अभिनेता ओंकार गोवर्धन याने ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ‘आशुतोष केळकर’ ही भूमिका साकारली होती.

काही दिवसांपूर्वी मालिकेत आलेल्या ट्वीस्टने ‘आशुतोष केळकर’ याचा मृत्यू झाला.

या ट्वीस्टमुळे ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील ‘आशुतोष केळकर’ या पात्राने एक्झिट घेतली होती.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून बाहेर पडलेला ‘आशुतोष’ आता काय करतो, असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेनंतर आता अभिनेता ओंकार गोवर्धन हा ‘वस्त्रहरण’ या नाटकात झळकत आहे.

‘वस्त्रहरण’ हे नाटक नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. यात ओंकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.

जास्त मीठ खाण्याचे परिणाम