लीला, वसुंधरा आणि पारूच्या नवीन आयुष्यात घडणार मोठा बदल!

By Harshada Bhirvandekar
Jun 05, 2024

Hindustan Times
Marathi

झी मराठीवर सुरु असलेल्या 'लग्न सराई विशेष' भागांमध्ये ‘पारू-आदित्य’, ‘आकाश-वसुंधरा’ आणि ‘एजे-लीला’ लग्नाच्या बंधनात बांधले गेले आहेत.  

या तीन जोडप्यांचं नातं भलेही प्रेमाच्या बंधनाने जोडले गेले नसेल, पण त्यांच्या समोर येणारं आयुष्य काय बदल घडवेल ते बघण्यासारखं असणार आहे. 

आता जरा ह्यांच्या लग्न सोहळ्यावर नजर घालूया. 'पारू आणि आदित्यच' लग्न केवळ एक जाहिरातीच्या शूटसाठी होतं. पण ही जाहिरात किर्लोस्करांची होती तर त्यांचा थाट बिलकुल ही कमी नव्हता. 

तर दुसरं जोडपं 'आकाश-वसूच' ज्यांच्या नात्याची सुरुवात वसुच्या मनात नसतानादेखील केवळ सासू सासऱ्यांच्या विनंती खातर, आकाशला अंधारात ठेवून केली आहे. 

या लग्नात संगीत पासून ते लग्नापर्यंत सर्व कार्यक्रम सुंदरपणे रचले गेले होते लाल आणि पिवळ्या रंगाच्या सहावारी नेसून, केसात लाल-पिवळे गुलाब माळून वसु नवरी रूपात सजली होती. 

तिसरं आणि सर्वात भव्य लग्न सोहळा ज्याची चर्चा सर्वत्र होतं आहे, ते म्हणजे एजे आणि लीलाच लग्न. इथे सगळं काही शाही होत आहे. 

अभिराम जहागीरदारच लग्न आहे तर संपूर्ण सजावटीत भव्यता दिसून येत होती. लग्नाची सात वचने एका सुंदर रांगोळी मध्ये लिहली गेली होती. 

तर नवदेव आणि नवरी सोनेरी रंगांच्या पोशाखात सजले होते. लीलाच्या लुकची खास गोष्ट म्हणजे तिच्या कमरेत बांधलेला सप्तपदीचा पट्टा. 

लग्नात जरी काही कमी नसली तरी पण जेव्हा नवरीचा चेहरा त्या ओढलेल्या पदरामधून सगळ्यांसमोर येईल तेव्हा काय होईल हे बघण्यासारखं असेल.

लेडी सुपरस्टार नयनताराच्या साडीत दिलखेचक अदा 

Instagram