श्रद्धा कपूरच्या अनेक चाहत्यांचे हृदय आज तुटलं आहे, कारण अभिनेत्रीने आज जाहीररीत्या तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे.
गेल्या काही काळापासून अशी चर्चा होती की, श्रद्धा कपूर चित्रपट लेखक राहुल मोदीला डेट करत आहे. मात्र आता तिने याची कबुली देखील दिली आहे.
श्रद्धाने राहुल मोदी सोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यात दोघेही कॅमेराकडे बघताना दिसत आहेत.
पांढऱ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दोघांनीही ट्विनिंग केले आहे. हा फोटो शेअर करत असताना श्रद्धाने लिहिलं की, ‘दिल रखले, नींद तो वापस दे दे यार...’
या फोटोच्या कॅप्शनमध्ये श्रद्धा कपूरने बॉयफ्रेंड राहुलला देखील टॅग केले आहे. सोशल मीडियावर श्रद्धा आणि राहुलचा हा फोटो खूप व्हायरल होतो आहे.
चाहत्यांना दोघांची जोडी आणि या दोघांची केमिस्ट्री चांगलीच पसंत पडली आहे. दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
यासोबतच चाहत्यांना राहुल मोदीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. राहुल मोदी कोण आहे आणि तो काय करतो, याबद्दल सगळ्यांना जाणून घ्यायचे आहे.
राहुल मोदी हा एक प्रसिद्ध चित्रपट लेखक आहे. त्याने ‘प्यार का पंचनामा २’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ आणि ‘तू झुठी मै मक्कार’ अशा चित्रपटांचं लेखन केलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, राहुल मोदी ३४ वर्षांचा आहे. तर, श्रद्धा कपूर ३७ वर्षांची आहे. दोघांच्या वयात तीन वर्षाचं अंतर आहे.
श्रद्धाच्या लव्हलाईफ बद्दल बोलायचं, तर राहुल मोदीच्या आधी अभिनेत्री रोहन श्रेष्ठाला डेट करत होती. दोघांचं नातं बरेच वर्ष टिकलं. मात्र, नंतर त्यांचा ब्रेक-अप झाला.
रोहनपासून वेगळं झाल्यानंतर श्रद्धाच्या आयुष्यात राहुल मोदी आला आणि या दोघांनी आपल्या नात्याची कबुली दिली आहे.
All Photos: Instagram
गरोदर महिलांनी आपल्या आहाराबाबत खूप काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने त्यांना अनेक फायदे होतात.