'या' आहेत जगातील सर्वात वेगाने धावणाऱ्या रेल्वे! 

By Ninad Vijayrao Deshmukh
Jan 18, 2025

Hindustan Times
Marathi

शांघाय मेगवेल ही जगातील सर्वात वेगवान रेल्वे असून ती चीनमध्ये धावते. ही ट्रेन शांघायला पुडोंग एयरपोर्टशी व लॉन्गयांग स्टेशनशी जोडते. या ट्रेनचा वेग ४६० प्रतितास एवढा आहे. 

जगात सर्वाधिक वेगाने धावणारी दुसऱ्या क्रमांकाची ट्रेनसुद्धा चीनमध्ये धावते. सीआर ४०० फॉक्सिंग असे या गाडीचे नाव असून चाचणी दरम्यान, ही गाडी ४२० प्रतीतास वेगापर्यंत पोहोचली होती. 

जगात वेगाच्या बाबतीत जर्मनीची आयसीई ३ ही इंटरसिटी एक्सप्रेस  रेल्वे तिसऱ्या स्थानावर आहे. या ट्रेनमध्ये बसवण्यात आलेल्या १६ मोटारी या रेल्वेला सर्वाधिक वेग प्रदान करतात. 

टीजीव्ही सर्विसेला जगातील हाय स्पीड रेल्वे सेवा प्रदान करण्याबाबत अग्रणी समजलं जातं. युरोपमधील ही रेल्वे सेवा पहिली डेडीकेटेड हायस्पीड नेटवर्क समजली जाते. 

जपानने जगाला १९६४ मध्ये हाय स्पीड रेल्वेचा परिचय करून दिला. जपानमध्ये Shinkansen मार्गावर ३०० किमी वेगाने रेल्वे धावली होती. 

अल बोराक ही आफ्रिका मधील एकमेव हाय स्पीड रेल्वे नेटवर्क असून याचं मुख्यालय मोरोक्कोमध्ये आहे. या मार्गावर फ्रान्समध्ये तयार झालेली, टीजीव्ही युरोडूपलेक्स रेल्वे धावत असून तिचा वेळ ताशी ३२० किमी प्रतितास एवढा आहे. 

स्पेनमध्ये धावणारी Alta Velocided Espana या ट्रेनचा वेळ प्रतितास ३१० किमी आहे. जुलै २००६मध्ये  या रेल्वेने प्रतितास ४०४ किमी वेग गाठला होता. 

सिओल आणि बूसान दरम्यान धावणाऱ्या केटीएक्स रेल्वे ३०५ किमी प्रतितास वेगाने धावते. ही रेल्वे सेवा २००४ मध्ये सुरू झाली होती. 

ट्रेनेटिलीया ईटिआर १००० ही इटलीमधील रेल्वे प्रतितास ३०० किमी वेगाने धावते. ही रेल्वे सेवा २०१७ मध्ये सुरू करण्यात आली होती.  

साऊदी अरब मध्ये मक्का व मदिना दरम्यान, धावणाऱ्या एचएचआर ट्रेनचा वेळ हा ३०० किमी एवढा आहे.  

माघ पौर्णिमेला करा हे सोपे उपाय, वाढेल सुख-समृद्धी