आयएएस अधिकारी स्मिता सबरवाल यांचं सौन्दर्य एखाद्या सिनेतारका पेक्षा काही कमी नाही.
त्या सोशल मिडियावर नेहमी त्यांचे फोटो अपलोड करत असतात.
स्मिता यांनी शेअर केलेले फोटो त्यांचे अनेक फॅन्स लाइक आणि शेअर करत असतात.
एवढेच नाही तर त्यांचे चाहते त्यांच्या फोटोवर प्रतिक्रिया देखील देत असतात.
९ जून १९७७ मध्ये दार्जिलिंग येथे स्मिता यांचा जन्म झाला असून त्या कर्नल प्रणव दास यांच्या कन्या आहेत.
. त्यांचं शिक्षण हे हेद्राबाद येथून पूर्ण झालं आहे. त्यांनी सिकंदराबाद येथील सेंट येन हाई शाळेतून शिक्षण पूर्ण केले.
आयएएस स्मिता सबरवाल यांनी सीआयएससीई बोर्डातून १९९५ मध्ये १२ वी परीक्षा उत्तीर्ण केली. यात त्यांनी चांगले गुण मिळवले.
यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. स्मिता या पहिल्या प्रयत्नात अयशस्वी झाल्या.
पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यावर त्यांनी हार मानली नाही. त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात चांगली तयारी करून ही परीक्षा दिली. यात त्यांनी कमाल केली. त्यांनी संपूर्ण भारतात ४ थी रँक मिळवली. त्या २००० बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत.