मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Bangalore Flyover Video : उड्डाणपुलावरून तरुणानं फेकल्या नव्याकोऱ्या नोटा, पाहा व्हायरल व्हिडिओ

Bangalore Flyover Video : उड्डाणपुलावरून तरुणानं फेकल्या नव्याकोऱ्या नोटा, पाहा व्हायरल व्हिडिओ

Jan 24, 2023 07:21 PM IST Atik Sikandar Shaikh
Jan 24, 2023 07:21 PM IST
  • Bangalore Flyover Viral Video : कर्नाटकातील बंगळुरुत तरुणानं उड्डाणपुलावरून नव्याकोऱ्या चलनी नोटा उधळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गळ्यात भलंमोठं घड्याळ आणि हातात नोटांची पिशवी घेतलेल्या तरुणानं अचानक पुलावरून नोटा खाली फेकायला सुरुवात केली. त्यामुळं उड्डाणपुलाखाली नोटा झेलण्यासाठी लोकांनी मोठी धावपळ करत एकमेकांना धक्काबुक्की केली. परिणामी रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाला ताब्यात घेतलं. त्यानंतर गर्दी पांगवत वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp