Mallikarjun Kharge On Amit Shah : उत्तर प्रदेशातील अयोध्येत निर्माणाधीन असलेल्या राममंदिराचं लवकरच उद्घाटन होणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलं आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनी 'तुम्ही राम मंदिरातील पुजारी आहात का?', असा सवाल करत गृहमंत्री अमित शहांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळं आता राममंदिराच्या मुद्द्यावरून देशात पुन्हा राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.