नाटकातून नाट्यरसिकांना वेगळी अनुभूती मिळत असते. मात्र आवड असूनही वयोमानामुळे आणि शारीरिक व्याधींमुळे ज्येष्ठ नाट्य रसिकांना प्रयोगाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागतो. अशा रसिकांसाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय नाट्यपरिषदेने पुढाकार घेतला आहे. याच प्रयत्नाचा भाग म्हणून नूतनीकरणानंतर नाट्यरसिकांसाठी २२ जूनपासून खुल्या होणाऱ्या माटुंग्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात अखिल भारतीय नाट्यपरिषदेतर्फे एका विशेष सुविधेची व्यवस्था ज्येष्ठ नाट्यरसिकांसाठी करण्यात आली आहे.