आई वडिलांकडून वारसा मिळालेल्या या आजाराची एक विचित्रता आहे की ह्या आजाराचे कारणं माहिती असून सुद्धा या पासून वाचता येणे अशक्य आहे. थॅलेसेमिया हा रक्ताचा विकार आहे जो असामान्य हिमोग्लोबिन आणि लाल रक्तपेशींच्या निर्मितीमुळे होतो. हिमोग्लोबिन तुमच्या लाल रक्तपेशींना ऑक्सिजन वाहून नेण्यास मदत करते. लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होऊ शकतो. जागतिक थॅलेसेमिया दिन दरवर्षी ८ मे रोजी जगभरात साजरा केला जातो. चला तर मग जाणून घेऊ या थॅलेसीमिया या गंभीर आजाराबद्दल माहिती, त्याचे लक्षण आणि प्रतिबंधित उपाय.