धूम्रपान करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. विशेषतः, गर्भधारणेसाठी प्रयत्न करणारे जोडप्यांसाठी आणि गर्भधारणे दरम्यान न जन्मलेल्या बाळासाठी हे धोकादायक ठरते. सिगारेटच्या धुरामध्ये अनेक हानिकारक रसायने असतात, जी गर्भधारणेच्या क्षमतेवर परिणाम करते. गरोदरपणात धूम्रपानाचा सर्वाधिक परिणाम बाळांवर दिसून येतो. पुरुषांमध्ये धुम्रपान हे शुक्राणूंच्या डीएनएचे नुकसान करते तसेच शुक्राणुंची संख्या कमी होणे, शुक्राणूंची गतिशीलता कमी होणे अशा समस्या होतात. धूम्रपानामुळे वंध्यत्वाची समस्या निर्माण होऊ शकते.