आयव्हीएफ प्रक्रियेत स्त्रीची अंडी आणि पुरूषाचे स्पर्म हे लॅबमध्ये तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र करण्यात येते आणि गर्भ निर्माण करण्यात येतो. यामध्ये ४ महत्त्वपूर्ण टप्पे समाविष्ट आहेत, जे अंडी उत्तेजित करण्यासाठी हार्मोन इंजेक्शनच्या दिवसापासून सुरू होतात ते गर्भधारणेच्या रक्त चाचणीपर्यंत जे गर्भ हस्तांतरित झाल्यानंतर सुमारे ९-१४ दिवसांनी पूर्ण होतात. संपूर्ण आयव्हीएफ सायकलसाठी १७-२० दिवस लागतात. परंतु रुग्णाच्या परिस्थितीनुसार हा कालावधी बदलू शकतो. याबाबत अधिक जाणून घ्या पुणे खराडीतील अंकुरा हॉस्पिटलच्या वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुप्रिया पुराणिक यांच्याकडून.