२८ जुलै दिवस जागतिक हिपॅटायटीस दिवस म्हणून साजरा केला जातो. हिपॅटायटीसबद्दल जागरुकतेचा अभाव ही मोठी समस्या आहे. लक्षणे दिसू लागतात तेव्हाच बहुतेक लोक डॉक्टरकडे जातात. त्यावेळी विषाणूने यकृतावर आधीच परिणाम केलेला असतो. अशा परिस्थितीत लक्षणांची माहिती आणि त्याविषयी जागरुकता जीव वाचवू शकते. हिपॅटायटीस म्हणजे काय आणि हिपॅटायटीस डी आणि ई बद्दल तज्ञ काय म्हणतात. व्हायरल हिपॅटायटीसचे कमी-ज्ञात प्रकार काय आहेत हे आपण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून डॉ मंगेश बोरकर यांच्याकडून. संसर्गाचा सामना करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे तो ओळखणे. त्याची लक्षणे समजून घेऊन योग्य वेळी तपासणी करुन घेतल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो.