Raj Thackeray on world Environment Day : जगभरात आज जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा केला जात आहे. या निमित्तानं देशोदेशींच्या सरकारांकडून व पर्यावरणप्रेमी संस्थांकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देताना एका कार्यक्रमात अमेरिकेतील चित्रकारांनी घडवलेल्या एका क्रांतीची गोष्ट सांगितली. अमेरिकेतील मूठभर धनाढ्यांनी ताब्यात घेतलेली निसर्गरम्य ठिकाणं अमेरिकन सरकारनं 'राष्ट्रीय उद्यानं' घोषित करण्यापर्यंतचा प्रवास कसा झाला, हे त्यांनी उलगडून सांगितलं.