ब्रेन ट्यूमर विषयी अनेक गैरसमज समाजात पहायला मिळतात यामधील काही गैरसमजूतींपैकी एक म्हणजे सर्वच ब्रेन ट्यूमर या कर्करोगाच्या असतात. तर वास्तविकता काही सर्वच गाठी कर्करोगाच्या नसतात. सगळेच ब्रेन ट्यूमर हे मेंदुमध्येच तयार होतात. तसेच मोबाईल फोनच्या रेडिएशनमुळे ब्रेन ट्यूमर होतो हा देखील एक गैरसमज आहे. या रेडिएशनचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असला तरी यामुळे ब्रेन ट्यूमर होत नाही. इतर आनुवांशिक आजारांप्रमाणेच ब्रेन ट्यूमरचा देखील आनुवांशिक धोका असल्याचं अनेकदा बोललं जातं. मात्र ब्रेन ट्यूमर आनुवांशिक असल्याचं अद्याप वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेलं नाही. ब्रेन ट्यूमर हा केवळ वयस्क लोकांनाच होतो हा एक मोठा गैरसमज आहे. ब्रेन ट्यूमर हा अगदी लहान मुलांपासून तरुण आणि वयोवृद्ध अशा कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना होवू शकतो.