जगभरात सगळीकडे महिला दिन साजरा होत असतानाच कलर्स मराठीवरील मालिकांमधील कलाकारांनीही मोठ्या जल्लोषात महिला दिन साजरा केला. कलर्स मराठीतर्फे आजोजित करण्यात आलेल्या 'महिलांची भव्य बाईक रॅली'ला अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली. यावेळी महिला दिनानिमित्त आयोजिलेल्या या खास बाईक रॅलीमध्ये 'भाग्य दिले तू मला' या मालिकेतील रत्नमाला (निवेदिता सराफ), कावेरी (तन्वी मुंडले), 'काव्यांजली'मधील मीनाक्षी ( पूजा पवार), काव्या (कश्मिरा कुलकर्णी) सहभागी झाल्या होत्या.