मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  प्रजनन आरोग्यासोबत लैंगिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

प्रजनन आरोग्यासोबत लैंगिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

Feb 19, 2024 06:02 PM IST Hiral Shriram Gawande
Feb 19, 2024 06:02 PM IST
  • प्रजनन क्षमता आणि प्रजनन प्रणालीच्या आरोग्याबाबत जनजागृतीची आवश्यकता आहे. याविषयावर बऱ्याचदा मोकळेपणाने चर्चा केली जात नाही, संकोच व्यक्त केला जातो. मासिक पाळीचे सामान्य चक्र हे २१ ते ३५ दिवसांचे असते. मात्र जर एखाद्या महिलेची पाळी २१ दिवसांच्या आत किंवा ३५ दिवसानंतर येत असली तर त्याकडे दुर्लक्ष करु नये कारण पाळी अनियमित असणे ही सामान्य बाब नाही. सामान्य मासिक पाळी ही २ ते ७ दिवस इतकी असते तर मात्र त्यापेक्षा कमी दिवस किंवा जास्त दिवस मासिक पाळी असणे, रक्ताच्या गुठळ्या येणे, अतिशय वेदना होणे किंवा कोणतेही असामान्य लक्षण दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नका. प्रजनन आरोग्याबरोबरच लैगिंक आरोग्याकडेही तितकेच लक्ष दिले गेले पाहिजे. सध्या एसटीआयचे वाढते प्रमाण पाहता वेळीच निदान व उपचार गरजेचे आहे कारण याचा प्रजनन प्रणालीवर दुष्परिणाम होतो. लैंगीक संक्रमणाकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात वंध्यत्वाचा सामना करावा लागू शकतो यासाठी वेळीच वैद्यकिय मदत घ्यायला विसरु नका.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp