Women Fighting Viral Video : बसमधील सीटवरून झालेल्या वादातून दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कर्नाटक राज्य शासनाच्या बसमध्ये ही धक्कादायक घडली असून त्यात दोन महिला एकमेकींना शिवीगाळ करताना दिसत आहे. याशिवाय वाद वाढल्यानंतर महिलांनी एकमेकींचे केस ओढून धक्काबुक्की केल्याचं व्हिडिओतून दिसत आहे. बसमधील एका व्यक्तीने मध्यस्थी करत वाद मिटवला आहे. या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.