Raigad Irshalwadi Landslide : रायगडच्या खालापूर तालुक्यातल्या इर्शाळवाडी या गावात भूस्खलन झाल्याने ४० ते ५० घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहे. बुधवारी रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास इर्शाळवाडीत भूस्खलन झालं असून त्यात पाच ते सहा लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. गावातील १०० हून अधिक लोक बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बचावकार्यात आतापर्यंत ३० ते ३५ लोकांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. यावेळी मुलं, महिला, घरातील पुरुष मातीत गाडले गेल्याचं समजताच महिलांना एकच आक्रोश केला. सध्या घटनास्थळावर बचावकार्य जारी असून नागरिकांना वाचवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे.