‘बिग बॉस मराठी ४’ या शोने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या खेळात वाईल्ड कार्ड म्हणून आलेली स्पर्धक अभिनेत्री राखी सावंत हिने बिग बॉस मराठीचं घर चांगलंच दणाणून सोडलं. खेळाच्या मध्यात आलेली राखी अगदी शेवटच्या दिवसापर्यंत या घरात टिकून राहिली. ‘बिग बॉस मराठी ४’च्या ‘टॉप ५’ स्पर्धकांमध्ये राखीने स्थान पटकावलं होतं. मात्र, महाअंतिम सोहळ्यात ९ लाख रुपये स्वीकारून खेळ सोडण्याची ऑफर स्वीकारत राखी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली होती. आपल्या आईच्या उपचारांसाठी या पैशांची गरज असल्याचे तिने म्हटले होते. मात्र, आता तिने या मागचं नेमकं कारण सांगत, एक व्हिडीओ शेअर केला आहे.